नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद परिसरात अवैध गोवंश कत्तल प्रकरणी पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तब्बल १२ लाख २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.दि. २८ मे २०२६ रोजी नशिराबाद सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे या पोलीस पथकासह गस्त घालत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, नशिराबाद पोलीस ठाणे हद्दीतील फातेमानगर भागातील ३६ खोली परिसरात काही व्यक्ती अवैधरित्या गोवंश कत्तलीचा व्यवसाय करीत आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ विशेष पथक तयार करण्यात आले.
पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला असता ९ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तसेच घटनास्थळी गोवंश कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि जनावरे आढळून आली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ३ गायी, १ बैल, ९ गोऱ्हे, २ लहान वासरे तसेच सुमारे २०० किलो गोमांस हस्तगत केले. याशिवाय कत्तलीसाठी वापरण्यात येणारे चाकू, सत्तूर आणि इतर साहित्य तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले.या संपूर्ण कारवाईत एकूण १२ लाख २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दरम्यान, कत्तलीसाठी आणण्यात आलेली काही गायी, वासरे व इतर जनावरे गोरक्षकांच्या मदतीने सुरक्षितरित्या कुसुंबा येथील रतनलाल सी. बाफना गोशाळा येथे हलविण्यात आली आहेत. जनावरांची योग्य काळजी घेण्यात येत असून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.याबाबत आरोपी क्र.१) नासिर शहा दिलावर शहा वय ४१ वर्ष, २) शब्बीर शहा दिलावर शहा वय ३२ वर्ष, ३) अबरार शेख अन्सार मन्यार वय २६ वर्ष, ४) शेख रफीक शेख इसाक वय. ३८, (आ.क्र.०१ ते ०४ रा. ३६ खोल्या, फातेमा नगर, जळगांव), ५) अकबर सत्तार खाटीक वय ४९ वर्ष. ६) आदील शरिफ चौधरी वय ३४ वर्ष, व्यवसाय खा. नोकरी, ७) सोहेल शरिफ चौधरी वय ३० वर्ष, आ.क्र.०५ ते २०७ रा.राम नगर, MIDC, जळगांव, ८) परवीन मुक्तार कुरेशी वय ३५ वर्ष, ९) मुक्तार जमाल कुरेशी, वय ४०, आ.क्र.८ व ९ रा.३६ खोल्या, फातेमा नगर, जळगांव यांना ताब्यात घेऊन या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३२५, २७५ तसेच महाराष्ट्र प्राणीसंवर्धन अधिनियम कलम ५, ५(क), ९, ९(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हरेष पाटील करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारोले यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत पो.उप.नि रविंद्र तायडे, पो.उप.नि. हरेष पाटील, सहाय्यक फौ. शरद सोनार, सहाय्यक फौ. राजेश मेंढे, पो.हे.कॉ. चंद्रकांत पाटील, पो.हे.कॉ. गुणवंत देशमुख, पो.हे.कॉ. प्रशांत विरनारे, पो.हे.कॉ. कमलाकर बागुल, पो.कॉ. भारत बाविस्कर, पो.कॉ. पंकज सोनवणे, पो.कॉ. विठ्ठल मुंडे, पो.कॉ. सागर बिडे, पो.कॉ. विजय अहिरे, पो.कॉ. भूषण पाटील, पो.कॉ. रामकृष्ण माळी या पोलीस कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.

