Monday, June 1, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यास्वयंशोध फाउंडेशनतर्फे नशिराबाद पंचक्रोशीतील ९० गुणवंत विद्यार्थ्यांचा थाटात गौरव

स्वयंशोध फाउंडेशनतर्फे नशिराबाद पंचक्रोशीतील ९० गुणवंत विद्यार्थ्यांचा थाटात गौरव

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथील स्वयंशोध फाउंडेशनतर्फे नुकताच इयत्ता १० वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात नशिराबाद पंचक्रोशीतील सुमारे ९० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हिजन अकॅडमीचे संचालक अनिल माला सर होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षा तथा निंभोरा गाव सेवा समितीच्या युवा संयोजिका कु. भाग्यश्री विवेक ठाकरे तसेच ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या वृषाली महाजन उपस्थित होत्या.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस बळ मिळावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नशिराबादसह मन्यारखेडा, कळगाव, जळगाव खुर्द, सुनसगाव आणि कडगाव येथील इयत्ता १० वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास नशिराबादचे नगराध्यक्ष योगेश पाटील, उपनगराध्यक्ष पंकजभाऊ महाजन, नगरसेवक चेतनभाऊ बऱ्हाटे, शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेशभाऊ चव्हाण, जळगाव मनसे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदभाऊ रोटे, मनोज नाले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअर नियोजन आणि उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वयंशोध फाउंडेशनचे सचिव धीरज सैतवाल यांनी केले. त्यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू पासपांडे सर यांनी केले.

हा गुणगौरव सोहळा यशस्वी करण्यासाठी स्वयंशोध फाउंडेशनचे सचिव धीरज सैतवाल, महेश सपकाळे, चेतन सपकाळे, सागर धोबी, विशाल सावळे, आदेश राजपूत आदींनी विशेष परिश्रम घेतले. आभारप्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या कौतुक सोहळ्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळाला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या