खेडी शिवारात अज्ञात वाहनाची धडक; ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरालगतच्या खेडी परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत ३५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रीतम संभाजी पाटील (वय ३५, रा. खेडी, कृष्ण मंदिराजवळ) असे मृत तरुणाचे नाव असून, अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.माहितीनुसार, प्रीतम पाटील हे मंगळवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून खेडी परिसरातील हनुमान मंदिराजवळून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले.स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
RELATED ARTICLES

