Friday, August 14, 2026
police dakshta logo
Homeजळगावअभाविप जळगाव महानगराची नूतन कार्यकारिणी जाहीरl

अभाविप जळगाव महानगराची नूतन कार्यकारिणी जाहीरl

महानगराध्यक्षपदी प्रा. डॉ. अमरदीप पाटील; महानगरमंत्रीपदी आर्यन भालशंकर

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :-अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) जळगाव महानगराच्या नूतन महानगर कार्यकारिणीची घोषणा मुळजी जेठा महाविद्यालयातील सोहम सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. यावेळी जळगाव महानगरासह तीन नगरांच्या कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली.जळगाव महानगराध्यक्षपदी प्रा. डॉ. अमरदीप पाटील, तर महानगरमंत्रीपदी आर्यन भालशंकर यांची निवड जाहीर करण्यात आली. महानगर सहमंत्री म्हणून मनोज कुंभारे व अंकुश सर्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली.यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज नगराध्यक्षपदी प्रा. बिपाशा पात्रा, नगरमंत्रीपदी रमण चौधरी; डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगराध्यक्षपदी प्रा. दीपक पाटील, नगरमंत्रीपदी ओम गुरव; तसेच विद्यापीठ नगराध्यक्षपदी प्रा. प्रिती सोनी, नगरमंत्रीपदी आयुष महाजन यांची घोषणा करण्यात आली. जळगाव महानगरातील दहा महाविद्यालय अध्यक्षांचीही यावेळी घोषणा करण्यात आली.यावेळी बोलताना देवगिरी प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे यांनी विद्यार्थी परिषद ही केवळ संघटनात्मक कार्य करणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि समाजहितासाठी नेतृत्व घडविणारे व्यासपीठ असल्याचे सांगितले. जळगाव महानगरातील नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडत विद्यार्थीहिताच्या विविध विषयांवर सातत्याने काम करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.नवनिर्वाचित महानगरमंत्री आर्यन भालशंकर यांनी जळगाव महानगरातील प्रत्येक महाविद्यालयापर्यंत अभाविपचे संघटन पोहोचवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच महाविद्यालयांमध्ये सकारात्मक विद्यार्थी नेतृत्व उभे करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी देवगिरी प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे, प्रदेश संघटनमंत्री श्री. सिद्धेश्वर लटपटे, जळगाव विभाग संघटनमंत्री अजित केंद्रे, जिल्हा प्रमुख प्रा. डॉ. भूषण राजपूत यांच्यासह अभाविपचे विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, सामाजिक तसेच विद्यार्थीहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडत जळगाव महानगरातील विद्यार्थी चळवळीला अधिक बळकटी देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या