Saturday, September 12, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याकुर्‍हे पानाचे येथे स्वप्निल स्मृती गोकुल ग्राममध्ये पहिला पोळा उत्साहात

कुर्‍हे पानाचे येथे स्वप्निल स्मृती गोकुल ग्राममध्ये पहिला पोळा उत्साहात

सर्जा-राजांची विधिवत पूजा; कर्मचाऱ्यांचा सत्कार

भुसावळ | प्रतिनिधी :- भुसावळ तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथील स्वर्गीय स्वप्निल स्मृती गोकुल ग्राम येथे यंदा प्रथमच पोळा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांना अनन्यसाधारण महत्त्व असून, पोळ्याच्या दिवशी सर्जा-राजांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांची विधिवत पूजा करण्याची परंपरा आहे.आधुनिक युगात शेतीच्या कामांसाठी यांत्रिकीकरण वाढले असून बैलांची जागा मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरने घेतली आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या जीवनातील बैलांचे महत्त्व आणि त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञतेची भावना आजही कायम आहे. याच भावनेतून गोकुल ग्राममध्ये पोळा सण साजरा करण्यात आला.या वेळी ललवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांनी सर्व सर्जा-राजांची विधिवत पूजा करून त्यांना नमन केले. यावेळी सरकारी अभियोक्ता अॅड. मोहन देशपांडे, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता राजीव एम. तडवी, सहाय्यक सरकारी अभियोक्ता रवींद्र रोकडे आणि सहाय्यक सरकारी अभियोक्ता भूषण भामरे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही पोळा सणाचा आनंद घेतला.गोकुल ग्राममधील सर्व नंदींची यथायोग्य पूजा करून आरती करण्यात आली. तसेच या निमित्ताने कर्मचाऱ्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. सौ. गायत्री जगताप व सौ. मंदा तोरे यांच्या हस्ते बळीराजाचे औक्षण करण्यात आले.याप्रसंगी सखाराम बारेला, गोलू राऊत, अप्पा जगताप, मनोज राठोड, रोशन बारेला, महेश जगताप आणि ईश्वर तोरे यांचा प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने साजरा झालेल्या या पोळा उत्सवामुळे स्वप्निल स्मृती गोकुल ग्राममध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या