Thursday, September 10, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणअडीचशे वर्षांची परंपरा जपत नशिराबादमध्ये बैलशर्यतीचा थरार

अडीचशे वर्षांची परंपरा जपत नशिराबादमध्ये बैलशर्यतीचा थरार

उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धेत किशोर मधुकर पाटील प्रथम; तर दीपक बोंडे, बालकृष्ण नारखेडे यांचे बैल शर्यतीत अव्वल..आठवडे बाजार परिसरात पोळ्याचा जल्लोष

नशिराबाद : शेतकरी आणि बैल यांच्यातील अतूट नाते अधोरेखित करणारा पोळा सण नशिराबाद येथे यंदाही पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. पोळ्यानिमित्त आठवडे बाजाराच्या प्रांगणात आयोजित विविध उपक्रमांमुळे परिसराला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले. विशेषतः गावाची सुमारे अडीचशे वर्षांची पारंपरिक बैलशर्यत आणि नगरपरिषदेच्या वतीने घेण्यात आलेली उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धा हे यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले.नगरपरिषदेतर्फे आयोजित उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धेत किशोर मधुकर पाटील यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक मिळविला. ज्ञानदेव कौतिक पाचपांडे यांच्या बैलजोडीने द्वितीय, तर सतीश पंडित कावळे यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ७ हजार १००, ५ हजार १०० आणि ३ हजार १०० रुपये, तसेच स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. तर उत्तेजनार्थ पाहिले बक्षीस लोकेश अनिल पाटील (पेठ) यांना रुपये ५१००, आणि दुसऱ्या क्रमांकावरील हर्षल ज्ञानदेव चौधरी (पेठ) यांना धनश्री ऍग्रो तर्फे देण्यात आले.  दरम्यान, नशिराबादच्या पोळा उत्सवाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख असलेल्या पारंपरिक बैलशर्यतीने उपस्थितांमध्ये विशेष उत्साह निर्माण केला. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या शर्यतीत दीपक बोंडे आणि बाळकृष्ण नारखेडे यांच्या बैलांनी उल्लेखनीय कामगिरी करत विजेतेपद पटकावले. दोन्ही विजेत्यांचा नगरपरिषदेच्या वतीने पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी बैलजोड्यांना आकर्षक पद्धतीने सजविले होते. पारंपरिक वाद्यांचा निनाद, सजलेल्या बैलजोड्या आणि शर्यतीतील चुरस यामुळे आठवडे बाजाराचे मैदान दिवसभर उत्साहाने गजबजून गेले होते. या सोहळ्यातून नशिराबादच्या कृषीप्रधान संस्कृतीचे आणि बैलांप्रती असलेल्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे दर्शन घडले.कार्यक्रमास नशिराबाद नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील, प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन, मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे, पाणीपुरवठा सभापती कीर्तिकांत चौबे, नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे, पोळा उत्सव समितीचे पदाधिकारी, सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या