आरोग्य शिबिरासह विविध स्पर्धा, जनजागृती व सत्कार कार्यक्रमांचे आयोजन
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा, समर्पण आणि जनसेवा’ या भावनेतून सेवा पंधरवडा विविध उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.या निमित्ताने १७ सप्टेंबर रोजी श्रीराम मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर विविध सेवाभावी व जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यामध्ये आरोग्य शिबिर, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाट्याद्वारे जनजागृती, सफाई कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविकांचा सत्कार आदी उपक्रमांचा समावेश आहे.तसेच विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसंदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विविध उपक्रमांमध्ये नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी केले.यावेळी नगरसेवक प्रदीप बोडरे, मनोज पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाचपांडे सर यांनी केले, तर आभार विनोद रंधे यांनी मानले.