नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :-नशिराबाद येथे बौद्ध पंच मंडळाच्या विद्यमाने ७० वा अशोक विजयादशमी तथा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त तथागत बौद्ध विहार येथे आयोजित कार्यक्रमात नगरपरिषदेच्या नगरसेविका जनाबाई रंधे आणि बौद्ध समाजाचे अध्यक्ष विनोद रंधे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी बौद्ध समाजाचे अध्यक्ष विनोद रंधे यांनी मनोगत व्यक्त करताना तथागत गौतम बुद्ध यांनी दिलेल्या धम्माचा संदेश तसेच सम्राट अशोक यांनी धम्मप्रसारासाठी केलेल्या त्यागाचे महत्त्व विशद केले. बौद्धाचार्य तुषार रंधे यांनी त्रिशरण, पंचशील, धूपपूजा व पुष्पपूजेचे विधिवत आयोजन केले. उपस्थित बौद्ध उपासक व उपासिकांनी त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून कार्यक्रमात सहभाग घेतला.या कार्यक्रमाला शांताराम सोनवणे, रमेश रंधे, यशवंत करडईकर, राजू वाघ, अनिल देवडे, प्रदीप सुरवाडे, संदीप सुरवाडे, शुभम सपकाळे, रतन सुरवाडे, रवी रंधे, प्रकाश सोनवणे, दीपक सोनवणे, दीपक सपकाळे, शेखर भालेराव यांच्यासह बौद्ध समाजातील उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंती समितीचे अध्यक्ष अभय सपकाळे यांनी केले, तर सतीश सावळे यांनी आभार मानले.