Tuesday, October 27, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणवाघूर धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मागणी अर्ज भरण्याचे आवाहन..!

वाघूर धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मागणी अर्ज भरण्याचे आवाहन..!

रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यापूर्वी अर्ज करणे आवश्यक.. २८ ऑक्टोबरपासून नशिराबाद येथे फॉर्म भरण्याची सुविधा..

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबादसह असोदा, भादली, भोलाणे, कडगाव तसेच वाघूर धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांतील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी मागणी अर्ज भरून द्यावेत, असे आवाहन वाघूर धरण डावा व उजवा कालवा सिंचन लाभधारक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.यंदाच्या रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यापूर्वी शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरणे आवश्यक आहे. विहित पद्धतीने अर्ज सादर न केल्यास संबंधित शेतकऱ्यांना पाण्याचे आवर्तन मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज भरून सहकार्य करावे, असे आवाहन समितीने केले आहे.पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी २८ ऑक्टोबर २०२६ पासून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नशिराबाद येथील वाघूर कॉलनी कार्यालयात सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्ज भरताना शेतकऱ्यांनी आपल्या शेताचा सातबारा उतारा सोबत आणणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसल्याची माहितीही समितीच्या वतीने देण्यात आली आहे.लाभक्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून द्यावेत, जेणेकरून रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याबाबत शासनदरबारी आवश्यक पाठपुरावा करता येईल.

शेतकऱ्यांनी या आवाहनाला प्रतिसाद देऊन सिंचन व्यवस्थेच्या नियोजनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वाघूर धरण डावा व उजवा कालवा सिंचन लाभधारक समितीने केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या