Tuesday, November 10, 2026
police dakshta logo
Homeक्राईमअनैतिक संबंधाच्या संशयातून शिरसोलीत खून; एमआयडीसी पोलिसांकडून आरोपीला तात्काळ अटक!

अनैतिक संबंधाच्या संशयातून शिरसोलीत खून; एमआयडीसी पोलिसांकडून आरोपीला तात्काळ अटक!

शिरसोली | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून झालेल्या वादातून एका ५५ वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा एमआयडीसी पोलिसांनी तातडीने तपास करून संशयित आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. मुकुंदा प्रल्हाद पाटील (वय ४२, रा. शिरसोली प्र. न., ता. जि. जळगाव) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ रोजी शिरसोली येथील फिर्यादीच्या घरी त्यांचे चुलत भाऊ गोरख विठ्ठल ठाकूर (वय ५५, मूळ रा. कारके वस्ती, लोणावळा, जि. पुणे, ह.मु. शिरसोली) आले होते. यावेळी त्यांचा शिरसोली येथील मुकुंदा प्रल्हाद पाटील याच्याशी वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यात गोरख ठाकूर गंभीर जखमी झाल्याने त्यांना जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाची तातडीने नियुक्ती केली. आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्याच्या सूचना पथकाला देण्यात आल्या.पोलिसांनी शिरसोलीसह आजूबाजूच्या परिसरात आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी मोबाईल फोन वापरत नसल्याने त्याचा शोध घेणे आव्हानात्मक होते. मात्र, गोपनीय माहितीच्या आधारे तो शिरसोली गावात लपून बसल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पथकाने तातडीने कारवाई करत त्याला शिताफीने ताब्यात घेतले.पोलिसांनी केलेल्या चौकशीत अनैतिक संबंधाच्या संशयावरून झालेल्या वादातून लाकडी दांडका व फावड्याच्या साहाय्याने गोरख ठाकूर यांना मारहाण केल्याची, तसेच डोक्यावर वार केल्याची कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी मुकुंदा प्रल्हाद पाटील याला गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली.या पथकात पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, गिरीष पाटील, धनराज गुळवे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी, राहुल घेटे, किरण पाटील आणि गणेश ठाकरे यांचा समावेश होता.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या