Saturday, November 14, 2026
police dakshta logo
Homeजळगावनशिराबादमध्ये भूकंपाचे दोन जोरदार धक्के; पहिला धक्का पहाटे ३ वाजता तर दुसरा...

नशिराबादमध्ये भूकंपाचे दोन जोरदार धक्के; पहिला धक्का पहाटे ३ वाजता तर दुसरा धक्का सकाळी ९:१४ वाजता..!

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथे आज, शनिवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी भूकंपाचे दोन जोरदार धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले. पहिला धक्का पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास, तर दुसरा धक्का सकाळी ९ वाजून १४ मिनिटांनी जाणवला. दोन्ही धक्क्यांची तीव्रता नागरिकांना प्रकर्षाने जाणवली.भूकंपाचा धक्का जाणवताना काही ठिकाणी आवाज झाल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच घरातील भांडी पडल्याचे, दरवाजे आणि खिडक्यांची जोरदार हालचाल होऊन आवाज झाल्याचेही स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले. अचानक जाणवलेल्या या धक्क्यांमुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले.

दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. भूकंपाची अधिकृत तीव्रता आणि केंद्रबिंदू याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने परिसरातील नागरिकांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. नशिराबादचे तलाठी रुपेश ठाकूर यांनीही नागरिकांशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, तसेच कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, भूकंपाच्या धक्क्यांबाबत अधिकृत यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानंतरच त्याची तीव्रता, केंद्रबिंदू आणि संभाव्य परिणाम स्पष्ट होणार आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या