Sunday, November 22, 2026
police dakshta logo
Homeक्राईमनशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई; आसारी चोरी करणारी टोळी जेरबंद

नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई; आसारी चोरी करणारी टोळी जेरबंद

चार आरोपींना अटक; ४०० किलो आसारीसह मालवाहू रिक्षा असा १ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत बांधकामासाठी वापरण्यात येणारी लोखंडी आसारी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेली सुमारे ४०० किलो आसारी आणि चोरीचा माल वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेली मालवाहू रिक्षा असा एकूण १ लाख २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीत बांधकामाच्या आसारी चोरीला गेल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून चोरीच्या टोळीतील चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गिरीश भागवत खैरनार (रा. कृष्ण मंदिराजवळ, नशिराबाद), पवन किशन कोल्हे (रा. नशिराबाद), तुषार दीपक चौधरी (रा. नशिराबाद) आणि सुमित चेतनसिंह महाजन (रा. नशिराबाद) यांचा समावेश आहे. याप्रकरणी चौकशीसाठी आठ ते दहा जणांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेली सुमारे ४०० किलो आसारी तसेच तिची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली मालवाहू रिक्षा असा एकूण १ लाख २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अटक केलेल्या चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशी दरम्यान अजूनही काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल गुणवंत देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, सागर बिडे, प्रवीण लोहार आणि गणेश गायकवाड यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल महाजन करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या