मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…
संभाजीनगर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- हर्सूल गावानजीक बोलेरो व कारचा अपघात होऊन कार मधील दोन जण जखमी झाल्याची घटना आज दि.२० रोजी सायंकाळी सव्वाचार वाजेच्या सुमारास घडली आहे.जखमींची नावे कळू शकली नसली तरी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नुजिवेडू सीड्स कंपनीचे कर्मचारी बोलेरो गाडीत होते ,त्यांची गाडी दुभाजकला आदळली असून कार क्रमांक एम.एच.२० ए वाय.०१५१ ही विरुद्ध बाजूने,चुकीच्या दिशेने येत होती. बोलेरोला तिने धडक दिली..अद्याप घटनास्थळी पोलीस पोहचलेले नाही.