मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…
सोलापूर/ जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील/ पोलीस दक्षता लाईव्ह:- भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त मौजे जामगाव बुद्रुक येथे गुरुवार दिनांक २० एप्रिल रोजी सायंकाळी ६:०० वाजता महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.यावेळी प्रतिमेचे पूजन गावचे कार्यकर्ते आर .पी.आय.गवई गटाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत गायकवाड साहेब व मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भीम क्रांती युवक क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाचे बाळासाहेब पांडुरंग गायकवाड साहेब , कामती पोलीस स्टेशनचे जाधव मेजर यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी जामगाव बुद्रुक येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त गावचे सरपंच -उपसरपंच सर्व सदस्य तसेच गाव कामगार पोलीस पाटील तसेच आर.पी.आय गवई गटाचे सर्व कार्यकर्ते व पोलीस दक्षता न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील तसेच आरपीआय जामगाव बुद्रुक शाखा अध्यक्ष सचिन गायकवाड आरपीआय सचिव ज्ञानेश्वर गायकवाड , दिगंबर गायकवाड, यशवंत गायकवाड, साहेबराव गायकवाड, सुरज गायकवाड, सतीश गायकवाड,सुजित कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जामगाव बुद्रुक येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त अनेकांनी शुभेच्छा दिल्या.