Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeक्राईमचोरट्याने कारची काच फोडून लॅपटॉप लांबविला; गुन्हा दाखल

चोरट्याने कारची काच फोडून लॅपटॉप लांबविला; गुन्हा दाखल

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

नाशिक / प्रतिनिधी /पोलीस दक्षता लाईव्ह:- नाशिक-अज्ञात चोरट्याने कारच्या दरवाजाची काच फोडून लॅपटॉपची चोरी केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी परेश आंबेवाडकर रा. चिंतन अपार्टमेंट इंदिरा नगर हे गंगापूर रोड वरील सीसीएम मॉल मध्ये गेले असता मॉल च्या पार्किंग मध्ये पार्क केलेली त्यांची एर्टिगा कार हिची अज्ञात चोरट्याने काच फोडून लॅपटॉप चोरी करुन नेला.तेथील सुरक्षा रक्षक नसल्याने चोरट्याने याचा फायदा घेतला.

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहर व परिसरात चोरीच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.
पुढील तपास पोलीस नाईक पगार करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या