Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeक्राईमबापाने १२ वर्षीय मुलाचा गळा चिरून केली हत्या; परिसरात सन्नाटा!

बापाने १२ वर्षीय मुलाचा गळा चिरून केली हत्या; परिसरात सन्नाटा!

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

अंबरनाथ / कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- अंबरनाथ-अत्यंत क्रूर पद्धतीने व खळबळ माजविणारी ,मन हेलावून टाकणारी घटना घडल्याने परिसरात सन्नाटा पसरला आहे. १२ वर्षाच्या मुलाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ मध्ये समोर आली आहे. यानंतर मुलाचा मृतदेह एका नाल्यात फेकून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. जन्मदात्या बापानेच हे दुष्कृत्य केले असून एकत्र खळबळ उडाली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मुलाच्या बापानेच त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. मुलाचा मृतदेह नाल्यात फेकण्याचा प्रयत्न करत असताना नागरिकांनी या निर्दयी बापाला पाहिल्यानंतर त्याने पळ काढला होता. तो धावत असताना त्याला हटकले, मात्र परत लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.या घटनेची चर्चा परिसरात होत होती. अंबरनाथ पोलीस पुढील तपास करीत आहे.

अंबरनाथ मध्ये दुसरी हत्या

अंबरनाथ शहरात एका दारुड्या बापाची मुलानेच हत्या केल्याची घटना घडली आहे. आईला नेहमी मारहाण करीत असल्याने मुलाने टोकाचे पाऊल उचलले,बुवा पाडा भागातील या घटनेमुळे खळबळ उडाली आहे ,दरम्यान या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून मुलाला अटक केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या