Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यारावेर बसला रांजणगावजवळ अपघात; प्रवासी बचावले...!

रावेर बसला रांजणगावजवळ अपघात; प्रवासी बचावले…!

पुणे /प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- भरधाव येणाऱ्या ट्रकने रावेर या एसटी बस स्लिपर कोच गाडीला जोरदार कट मारला, रांजणगाव औद्योगिक वसाहत जवळ अपघात झाला, त्यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

या अपघाताची मिळालेली अधिक माहिती अशी की, पुणे- रावेर या एसटी बस स्लिपर कोच गाडी पुण्याहून निघाली असता या गाडीला रांजणगाव औद्योगिक वसाहतजवळ कंडक्टर च्या बाजूने ट्रकवाल्याने जोरदार कट मारल्या मुळे कंडक्टरच्या कॅबिन व काच फुटली व आरसा पण तुटला ,या बसमध्ये अनेक प्रवासी होते ,अगदी थोडक्यात प्रवासी बचावले आहेत ,काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. परंतु चालकाने प्रसंगी सावधानतेने गाडीला वाचवत कोणत्याही प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही, मात्र मुक्का मार बसला. रांजणगाव पोलिस ठाण्यात या घटनेबाबत नोंद करण्यात आली, ही घटना रात्री घडली. शिरूर डेपोला प्रवाशी दरवाजा दुरुस्त करण्यात आला व उघडण्यात आला व गाडी रावेरकडे सुखरूप प्रवासाला निघाली.सध्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या