Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeजळगावपालजवळील गारबर्डी येथे अतिक्रमण; वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला,३ जखमी

पालजवळील गारबर्डी येथे अतिक्रमण; वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला,३ जखमी

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव सातपुडा पट्यात वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण वाढत चालले आहे.रावेर वन विभागाच्या हद्दीत गारबर्डी वनविभागाच्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण काढण्याची मोहीम दोन दिवसांपासून सुरु होती. दरम्यान या मोहिमेला जमावाकडून जोरदार विरोध सुरु झाला. यावेळी आरडाओरड व दगडफेक करुन अतिक्रमण अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या जेसीबीचे काच फोडले व हेडलाईट फोडून नुकसान करण्यात आले. चालक दिलीप बारेला यांच्या हाताला, सुनिल गौड यांच्या डोक्याला आणि दोन्ही हातांना तसेच यावलचे भैय्यासाहेब गायकवाड यांच्या हाताला दुखापत झाली आहे.गारबर्डी परिसरात काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची अधून मधून चकरा सुरू आहेत,असे श्री. तडवी यांनी सांगितले.

सुमारे ३२ जणांविरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 177 / 23 भा.द.वि. 363, 332,336, 337, 341, 143, 147, 148, 149, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप- निरीक्षक विशाल सोनवणे करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या