Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्या"द केरला स्टोरी" महाराष्ट्रात करमुक्त होणार...!

“द केरला स्टोरी” महाराष्ट्रात करमुक्त होणार…!

द केरला स्टोरी” महाराष्ट्रात करमुक्त होणार…!

मुंबई/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- ‘द केरला स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित होऊन आज चौथा दिवस उजाडला तरी त्याबद्दलचे वाद प्रतिवाद संपुष्टात यायचे चिन्ह दिसत नाहीत. अशातच उत्तर प्रदेशात ‘द केरला स्टोरी’ चित्रपट करमुक्त केला असल्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.महाराष्ट्रातही हा चित्रपट करमुक्त करण्यात येणार आहे. त्याचबरोबर १२ मे रोजी लखनौ मध्ये संपूर्ण कॅबिनेटसह चित्रपट पाहायला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हा चित्रपट मंगळवारपासून उत्तर प्रदेशात करमुक्त केला गेला आहे. त्याचसोबत यापूर्वी मध्य प्रदेशमध्येही चित्रपट करमुक्त करण्यात आला होता. या पाठोपाठ महाराष्ट्रात देखील केरळ स्टोरी हा चित्रपट लवकरच करमुक्त होईल. याउलट तामिळनाडू आणि बंगाल मध्ये मात्र या चित्रपटावर कायदा व सुव्यवस्थेचे कारण सांगून निर्बंध लावण्यात आले होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या