Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईममोर धरण परिसरात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मोर धरण परिसरात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

यावल/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- तालुक्यातील हिंगोणा येथून जवळच असलेल्या मोरधरण परिसरातील शेती शिवाराच्या विहिरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. या घटनेप्रकरणी फैजपूर पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील हिंगोणा येथून जवळच असलेल्या मोर धरण परिसरातील शेती शिवारात असलेल्या गट नंबर १२०३ या शेतात शेतमजूर काम करण्यासाठी गेले होते,त्यांना विहिरीतून काहीतरी दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे मजुरांनी विहिरीत डोकावून पाहिले तर मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. सदरील बाबीची माहिती शेतात काम करणाऱ्यासाठी आलेल्या मजुरांनी तात्काळ शेतमालकाला कळविली. याप्रसंगी शेतमालकाने ही माहिती हिंगोणा गावाचे पोलीस पाटील दिनेश बाविस्कर यांना दिली. यानंतर हिंगोणा पोलीस पाटील बाविस्कर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन खात्री केली. आणि सदरच्या घटनेची माहिती फैजपूर पोलीस ठाण्यात दिली. फैजपूर येथील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पाणबुड्याच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला व शवविच्छेदन देखील घटनास्थळीच करण्यात आले. मृतदेह महिलेचा होता, अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने महिलेची ओळख पटू शकलेली नाही. महिलेचे वय अंदाजे ४४ वर्ष असावे.तिच्या हातावरती सखाराम सुभाष असे नाव गोंदलेले आढळून आले. याबाबत फैजपूर पोलिसांकडून या महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास फैजपर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या