Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeक्राईमविविध जिल्ह्यात दिवसा घरफोड्या करणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दाफाश; पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक...!

विविध जिल्ह्यात दिवसा घरफोड्या करणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दाफाश; पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक…!

जळगाव/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात तसेच इतर जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक जळगाव, मा. रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली गोपनिय माहितीचे आधारे जळगाव जिल्ह्यातील विशेषतः जळगाव शहर, भुसावळ, चाळीसगाव तसेच औरंगाबाद, नाशिक, पुणे या जिल्हामधील विविध अपार्टमेंटमध्ये घुसून भरदिवसा घरफोडी चोरी करणारी अट्टल गुन्हेगारांची टोळी पकडण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

सविस्तर वृत्त असे की एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक जळगाव यांना गुप्त बातमी मिळाली की, १) जितेंद्र गोकुळ पाटील, २) अमोल गोकुळ पाटील, ३) पवन ऊर्फ पप्पु सुभाष पाटील, ४) सागर लक्ष्मण देवरे, स रा. मोहाडी ता. जामनेर, ५) आकाश सुभाष निकम, ६) महेंद्र ज्ञानेश्वर बोरसे, अ.नं ५ ते ६ रा.नांद्रा पाचोरा, ७) अमोल सुरेश चव्हाण रा. सामनेर ता.पाचोरा यांचे कडेस चोरीच्या गुन्हयांत सोन्या-चांदीचे दागिने व त्यांचेकडे असलेल्या कारला ते नेहमी वेगवेगळे नंबर प्लेट लावून फिरतात अशी माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे किसन नजन पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या अधिपत्त्याखालील पथके निर्माण करुन सदर आरोपींचे शोधकामी रवाना केले. पथकांनी संशयीत आरोपीतांपैकी १) सागर लक्ष्मण देवरे, सर्व रा. मोहाडी ता. जामनेर, २) आकाश सुभाष निकम, अमोल सुरेश चव्हाण, ४) महेंद्र ज्ञानेश्वर बोरसे यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडेस चौकशी करता आरोपीतांनी सांगितले की, १) जितेंद्र गोकुळ पाटील, २) अमोल गोकुळ पाटील, ३) पवन ऊर्फ पप्पु सुभा पाटील, ४) सागर लक्ष्मण देवरे, सर्व रा. मोहाडी ता. जामनेर, ५) आकाश सुभाष निकम, ६) महेंद्र ज्ञानेश् बोरसे, अ.नं. ५ ते ६ रा.नांद्रा ता. पाचोरा यांनी सर्वानी मिळून गेले २-३ वर्षांपासुन कधी तीन जण, कधी चार जण, तर कधी पाच जण असे पांढरे रंगाची स्विफ्ट डिझायर, क्रेटा, तसेच इर्टीगा या चारचाकी वाहनांचा वापर करून सदर वाहनांना वेगवेगळ्या पासिंगच्या नंबरच्या नंबरप्लेट लावुन जळगाव जिल्हामध्ये विशेषत जळगाव शहर, भुसावळ व चाळीसगाव येथे तसेच औरंगाबाद, नाशिक, पुणे जिल्ह्यामध्ये भरदिवसा विशेषत जळगाव येथे बंद असलेल्या घराचे कुलूप त्यांचेकडील हत्याराने तोडून अनेक घरफोडी चोऱ्या केलेल्या आहेत अशी कबुली दिलेली आहे. नमुद आरोपींचे ताब्यातुन ३ लाखाची रोख रक्कम, चांदी हस्तगत केली आहे. दागिने, तसेच घरफोडी करण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे हत्यारे, एक गावठी कट्टा व चारचाकी वाहनांच्या वेगवेगळ्या पासिंगच्या २४ नंबरप्लेट असे साहित्य मिळून आले, तसेच घरफोडीत मिळालेले सोन्याचे दागिने विकण्यासाठी त्यांना ७) अमोल सुरेश चव्हाण रा. सामनेर ता. पाचोरा याने मदत केलेली आहे. सदरचे दागिन्यापैकी काही दागिने अमोल चव्हाण याने वेळोवेळी त्याचे ओळखीचे योगेश हनुमंत मोरे (लक्ष्मी ज्वेलर्स)जोशीपेठ संकेत शशिकांत देशमुख यांना विकलेले आहे. सदरचे दागिने चोरीचे असल्याचे माहित असून ते कमी किंमतीत विकत घेत होते. तसेच सदर आरोपीतांपैकी १) जितेंद्र गोकुळ पाटील, २) अमोल गोकुळ पाटील, ३) पवन ऊर्फ पप्पु सुभाष पाटील, सर्व रा. मोहाडी ता. जामनेर हे वाहनांसह फरार झालेले आहेत.ते पकडले गेल्यास त्यांचेकडून अजुनही बरेच गुन्हे उघड होऊ शकतात तसेच चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या अजुनही काही सोनारांचे नावे समोर येऊ शकतात. सदर आरोपीतांकडून जळगाव जिल्हयातील तब्बल ३१ घरफोडीचे गुन्हे उघड झालेले आहेत.
तसेच नाशिक, पुणे, औरंगाबाद या जिल्ह्यात सुध्दा वेगवेगळ्या ठिकाणी याच प्रकारच्या घरफोडी चोरी आरोपीनी कबुली दिलेली आहे. सदरची कारवाई एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक, चंद्रकांत गवळी अपर पोलीस अधीक्षक, जळगाव रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव यांचे मार्गदर्शनाखाली किसन नजन पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी व त्यांचे अधिपत्त्याखालील पोउनि, गणेश वाघमारे, पोउनि, अमोल देवढे, सफी युनुस शेख, रवि नरवाडे, अनिल जाधव, पोह राजेश मेंढे, संजय हिवरकर, सुनिल दामोदरे, संदिप पाटील, अशरफ शेख, गोरख बागुल, कमलाकर बागुल, जयंत चौधरी, अनिल देशमुख, अक्रम शेख, संदिप सावळे, लक्ष्मण पाटील, दिपक पाटील, पोना संतोष मायकल, प्रितम पाटील, प्रविण मांडोळे, रणजीत जाधव, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल बैसाणे, परेश महाजन, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, महेश पाटील, लोकेश माळी, पोह भरत पाटील, प्रमोद ठाकुर, मोतीलाल चौधरी सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव तसेच पोलीस नाईक करुणासागर अशोक जाधव, पोलीस मुख्यालय, जळगाव अशांनी सदची कारवाई केली आहे..

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या