Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमपरीक्षेला अमळनेरात आलेली महाविद्यालयीन युवती बेपत्ता; पोलिसात तक्रार दाखल

परीक्षेला अमळनेरात आलेली महाविद्यालयीन युवती बेपत्ता; पोलिसात तक्रार दाखल

अमळनेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- कला शाखेच्या बी.ए.च्या तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेला आलेली चोपडा तालुक्यातील एकवीस वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना २५ रोजी दुपारी ३ ते ५ दरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.. याबाबत अधिक माहिती अशी की, बुधगाव ता. चोपडा येथील २१ वर्षीय तरुणीला तिच्या वडिलांनी २५ रोजी दुपारी तीन वाजता अमळनेर येथील धनदाई महाविद्यालयात परीक्षेसाठी प्रवेशद्वारावर सोडले होते. मात्र तिचे वडील सायंकाळी ५ वाजता परत घ्यायला आले असता ती महाविद्यालयातून परत आली नाही.अमळनेर पोलीस स्टेशनला या घटनेप्रकरणी हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे, पुढील तपास अमळनेर ग्रामीणचे पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या