Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यादापोली कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ.उज्वला चक्रदेव...!

दापोली कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ.उज्वला चक्रदेव…!

रत्नागिरी/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- दापोली, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू उज्वला चक्रदेव यांच्याकडे देण्यात आला आहे. कुलगुरूपदी उज्वला चक्रदेव यांची अतिरिक्त कुलगुरू म्हणून नियुक्ती झाल्याने दापोली कोकण कृषी विद्यापीठाला 50 वर्षानंतर पहिल्यांदाच महिला कुलगुरू मिळणार आहे. येत्या 28 मे रोजी दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉक्टर संजय सावंत सेवानिवृत्त होत असल्याने चक्रदेव यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. तसंच दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या नवनियुक्त कुलगुरू निवडीची 28 मे रोजी पाच सदस्यांची मुलाखत निवड समिती समोर होणार आहे. या पाच सदस्यातून दापोली कोकण कृषी विद्यापीठाला कुलगुरू मिळणार आहे. कुलगुरूंची निवड होईपर्यंत चक्रदेव या दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रति कुलगुरू असतील. त्यांच्या नियुक्तीचे पत्र राज्यपाल रमेश बैस यांनी जाहीर केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या