Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमकांदिवलीच्या लालजी पाडा येथे गोळीबार; तरुणाचा मृत्यू

कांदिवलीच्या लालजी पाडा येथे गोळीबार; तरुणाचा मृत्यू

मुंबई/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- मुंबई पश्चिम उपनगरातील कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालजी पाडा परिसरात गोळीबाराची घटना घडली. आज (28 मे) सकाळी 7 वाजून 57 मिनिटांनी ही गोळीबाराची घटना घडली. या घटनेत एका 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. गोळीबार नेमका कशावरुन झाला हे मात्र अद्याप समजलेलं नाही. गोळीबार करुन आरोपी फरार झाला आहे.

दरम्यान गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कांदिवली पोलीस काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करुन पोलिसांनी तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. गोळीबाराच्या घटनेमुळे कांदिवली लालजी पाडा परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. विशेष म्हणजे कांदिवली लालजी पाडा परिसरात मागील सहा ते सात महिन्यांतील गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. याआधी 1 ऑक्टोबर 2022 रोजी गोळीबाराची घटना घडली होती. दरम्यान मृत तरुण या परिसरात टँकरने पाणी विक्रीचा व्यवसाय करत होता. याच व्यवसायाच्या वर्चस्व वादातून त्याची हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कांदिवली पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात कांदिवली पश्चिमेतील लालजी पाडा परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. परिसरात मध्यरात्री अचानक गोळीबार करण्यात आला. तब्बल चार राऊंड फायरिंग झाली होती. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता तर अन्य तिघे जखमी झाले होते. मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. बाईकवरुन आलेल्या दोघांनी अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली. परस्परांमध्ये असलेल्या वादातून गोळीबार करण्यात आला होता.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या