Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमपिंप्री अकाराऊत जवळ १८ लाखांचा गुटखा जप्त; गुन्हा दाखल

पिंप्री अकाराऊत जवळ १८ लाखांचा गुटखा जप्त; गुन्हा दाखल

मुक्ताईनगर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- मुक्ताईनगर तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले आहे.अनेकवेळा सट्टा, अवैध दारू यासह गुटखा पोलिसांनी हस्तगत गेला आहे. अलीकडच्या काळात अवैध गुटखा तस्करी व विक्रीचा मोठया प्रमाणावर घटना घडत असताना मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री अकाराऊत गावाजवळ हॉटेल ओम साई जवळ अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत तब्बल १८ लक्ष रूपयांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासन खात्याचे अन्न सुरक्षा अधिकारी रामचंद्र भरकड यांना पिंप्री अकाराऊत गावाजवळ असलेल्या सार्वजनीक ठिकाणी एका वाहनातून छत्रपती संभाजी महाराज नगर येथे प्रतिबंधीत गुटखा नेला जात असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार त्यांनी कारवाई करून बोलेरो हे वाहन जप्त केले आहे. यात प्रतिबंध असलेल्या उत्पादनांसह याचे एकत्रीत मूल्य सुमारे १८ लाख ३ हजार ६०० रूपये इतके आहे. या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यातील संशयितांमध्ये वाहन चालक सचिन भिमराव कोलते ( तरा. हर्सल, छत्रपती संभाजी महाराज नगर ); क्लीनर सुभाष रंगनाथ कनासे, वाहन मालक गजानन बाबासाहेब लेंभे, जावेदभाई आणि सोहेल हबीब (सर्व रा. छत्रपती संभाजी महाराज नगर ) यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरिक्षक प्रदीप शेवाळे आणि हवालदार संतोष चौधरी हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या