जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव सध्या सर्वत्र घरफोड्या ,दरोडे आणि खुनाच्या घटना घडत आहेत.जळगावात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत असून अशातच शहरातील बँकेत शस्त्राच्या बळावर भर दिवसा दरोडा टाकून लाखो रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली आहे.
राष्ट्रीय महामार्ग जवलीलबकालींका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या नजीक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हा दरोडा टाकला; या घटनेने मोठी शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आज सकाळी नऊ ते साडेनऊ वाजता बँक उघडून नियमीतपणे कारभार सुरू झाल्यानंतर दोन तरुण दुचाकीवरून बँकेत आले आणि त्यांच्याकडे असलेल्या शस्त्राच्या बळावर त्यांनी व्यवस्थापकासह पाच-सहा कर्मचार्यांना धमकावून अंदाजे १५ लाखांपेक्षा रूपयांची रोकड आणि सोने घेऊन पसार झाले. दरम्यान, दरोडेखोरांनी बँकेच्या व्यवस्थापकावर वार करून त्यांना जखमी केलं आहे. त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बँकेत धाव घेतली आणि श्वास पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.