Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईममंद्रूप येथे पतीने पत्नीची सत्तूरने गळा कापून स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या

मंद्रूप येथे पतीने पत्नीची सत्तूरने गळा कापून स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या

सोलापुर/जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील/पोलीस दक्षता लाईव्ह:- दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे एक धक्कादायक घटना घडली आहे.अज्ञात कारणावरुन पतीने पत्नीची सत्तूरने गळा कापून स्वतः झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.लाडलेसब हुसेनी नदाफ( वय वर्षे 65) असे पत्नीची हत्या करणार्‍या पतीचे नांव असून नगुमा लाडलेसब नदाफ (वय वर्षे 63) असे मृत पत्नीचे नांव आहे. घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पीएसआय शहाजी कांबळे,माजिद शेख,शाहनूर फकीर,सागर चव्हाण कृष्णा पवार संजय कांबळे अविनाश पाटील आदींनी घटनास्थळी हजर होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.या ठिकाणी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.अधिक तपास मंद्रूप पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या