अमळनेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- अमळनेर मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाडाची फांदी अंगावर पडून वृद्ध महिलेचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना अमळनेर तालुक्यातील पिंपळी येथे दि.४ रोजी संध्याकाळी घडली असून या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील पिंपळी प्र.ज. येथे सुंदरबाई तुकडू बाविस्कर (वय ८८ वर्षे) ही आजीबाई दि.४ रोजी दुपारी १२ वाजता शौचास गेलेली होती. घरी परत येताना अचानक जोरात वादळ आल्याने तिच्या अंगावर निंबाच्या झाडाची फांदी पडून तिचा जागीच मृत्यू झाला. याबाबत गावातील तलाठी स्वप्निल कुळकर्णी यांनी पंचनामा केला. यावेळी सरपंच प्रेमराज चव्हाण, ग्रामसेवक विवेक सुर्यवंशी, पोलीस पाटील मिना महाजन आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या घटनेने तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने अतोनात नुकसान झाले आहे.
झाडाची फांदी पडल्याने वृद्धेचा दुर्दैवी मृत्यू
RELATED ARTICLES

