Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यामाथेरानच्या मॅरेथॉन स्पर्धेत विजय फिरके द्वितीय

माथेरानच्या मॅरेथॉन स्पर्धेत विजय फिरके द्वितीय

भुसावळ/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे धावपटू विजय फिरके यांनी माथेरान येथे नुकत्याच झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. दगडधोड्यांचा पन्नास किलोमीटरचा मार्ग त्यांनी सहा तास २२ मिनिटे व ३६ सेकंदात पूर्ण केला. ‘रन बडीज रेसेस’ ने माथेरान एन्डुराथॉन ( रनिंग) स्पर्धेचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे, ही स्पर्धा डांबरी रस्त्यावर नव्हती तर दगडधोंडे असलेल्या कच्च्या रस्त्यावर होती. या स्पर्धेत पुणे, मुंबई, नाशिक, पुणे व राज्यातील इतर ठिकाणांसह बाहेरील राज्यातूनही सुमारे ३५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत भुसावळचे विजय फिरके (वय ५७) यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा खूप खडतर व अवघड होती. त्यांनी सहा तास २२ मिनिटे व ३६ सेकंद या वेळेत ती पूर्ण करून ४० पेक्षा जास्त वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या