Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याविद्यार्थिनीच्या मृत्यूची राज्य महिला आयोगाने घेतली दखल

विद्यार्थिनीच्या मृत्यूची राज्य महिला आयोगाने घेतली दखल

मुंबई/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- मुंबई येथे शासकीय विद्यार्थिनी वसतिगृहामध्ये झालेल्या १९ वर्षीय विद्यार्थीनीच्या मृत्यू संदर्भात मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन आणि सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी वसतिगृह येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या सुप्रदा फातरपेकर, उत्कर्षा रुपवते यांनी भेट दिली. पीडित मुलीच्या आई वडिलांची देखील यावेळी भेट झाली. शासकीय वसतिगृहातील घडलेल्या या घटनेमुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारने याची गंभीर नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या संपूर्ण विषयाबद्दल उच्च शिक्षण विभाग व पोलीस प्रशासनाला तात्काळ अहवाल सादर करण्यासाठी राज्य महिला आयोगाने निर्देश दिले आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या