Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याझाड कोसळल्याने एका शिक्षकांचा करुण अंत

झाड कोसळल्याने एका शिक्षकांचा करुण अंत

धुळे/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जोरात वारा वादळ आणि विजांचा कडकडाट आणि पाऊस सुरू असताना दुचाकीने जात असलेल्या दोन जणांच्या अंगावर अचानक कडुनिंबाचे झाड कोसळल्याने माध्यमिक शिक्षक वैभव वसंत दशपुते हे जागीच ठार झाले. यात एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना नवापूर-सामोडे रस्त्यावर घडली.

नवापूर रस्त्याचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याची एक बाजू जेसीबीने पूर्ण खोदण्यात आली आहे. या रस्त्याच्या कडेला कडुनिंबाचे झाड होते. खोदकामामुळे झाडाच्या मुळ्या तुटून उघड्या पडल्याने वादळामुळे हे झाड कोसळले. या प्रकरणी पिंपळनेर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या