Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यामालेगावच्या महाराजा गायकवाड कॉलेजमध्ये मौलानांचे हिंदूंच्या धर्मांतराचे षडयंत्र...!

मालेगावच्या महाराजा गायकवाड कॉलेजमध्ये मौलानांचे हिंदूंच्या धर्मांतराचे षडयंत्र…!

नाशिक/ कार्यकारी संपादकतुषार वाघुळदे/ पोलीस दक्षता लाईव्ह:- बापरे.. !! अतिशय थक्क करणारी घटना घडल्याने मालेगाव शहरात विविध चर्चेला उत आला आहे. नाशिक जिल्‍ह्यातील मालेगाव येथे महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात मौलानांनी ११ जून रोजी ‘मशीद मिलन गुड करियर’ या नावाने ‘सत्‍य मलिक लोकसेवा ग्रुप’च्‍या वतीने ‘नॅशनल कॅडेट कॉर्प्‍स’च्‍या (एन्.सी.सी.च्‍या) हिंदू विद्यार्थ्‍यांना बळजोरीने समवेत घेऊन एक दिवसीय कार्यक्रम आयोजित केला. त्‍यात इस्‍लामी धर्मगुरु आणि मौलवी यांनी हिंदू विद्यार्थ्‍यांना ‘एन्.सी.सी.’चे प्रशिक्षण देऊ’, असे खोटे सांगून कुराणातील आयातांची (वाक्‍यांची) माहिती दिली. या कार्यक्रमातून हिंदू विद्यार्थ्‍यांच्‍या धर्मांतराचा प्रयत्न करण्‍यात आला. या घटनेने खळबळ माजली आहे.हा कार्यक्रम धर्मांतर आणि ‘लव्‍ह जिहाद’ या हेतूने हिंदू तरुणांना लक्ष्य करण्‍याचे सुनियोजित षड्‌यंत्र आहे. कार्यक्रमात इस्‍लामी उपासनापद्धत शिकवून एक दिवसीय धर्मांतर केले आहे. या अपप्रकाराची चौकशी करण्‍यात यावी’, अशी मागणी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी केली.आणि कार्यक्रमाला विरोध केला गेला.कुठलीही कायदेशीर अनुमती न घेता कार्यक्रम आयोजित केल्‍याच्‍या प्रकरणी महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांना तातडीने निलंबित केले आहे. या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्‍यासाठी इस्‍लामी धर्मगुरु आणि मौलवी असे एकूण ४० जण उत्तरप्रदेशातून आल्‍याचे बोलले जात आहे. दरम्यान या झालेल्या प्रकाराची कसून चौकशी करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या