Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमअल्पवयीन मुलीला पळवून नेऊन बलात्कार ; आरोपीस धुळ्यात अटक

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन बलात्कार ; आरोपीस धुळ्यात अटक

अमळनेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जिल्ह्यात अनेक प्रकारचे गुन्हे घडत असून पोलीस प्रशासनाबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.तीन महिन्यांपूर्वी तालुक्यातील अंतुर्ली येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा तरुण तिचा सख्या मावस भाऊच असल्याचे निष्पन्न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मारवड ग्रामीण पोलिसांनी मुलीच्या जबाबावरून बलात्कार आणि पोस्को या कायद्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अतुर्ली येथील एका मजूर महिलेची मुलगी ३ मार्च रोजी तिच्यासोबत रात्री झोपली होती. सकाळी सहा वाजेपूर्वी ती गायब झाल्याने मारवड पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी आणि मुलगी धुळे येथे औद्योगिक वसाहतीमध्ये वास्तव्यास असल्याचे समजले. तांत्रिक माहितीच्या आधारे हेडकॉन्स्टेबल संजय पाटील, मुकेश साळुंखे, उज्वल पाटील यांनी आरोपी आणि मुलीला ताब्यात घेऊन मारवड पोलीस स्टेशन येथे आणले. मुलीला पळवून नेणारा आरोपी हिरालाल सोमनाथ मोरे (वय २३, रा. चिंचवार जिल्हा धुळे) हा मुलीचा मावसभाऊच असल्याचे समजले, त्याने ३ मार्च रोजी मोटरसायकलवरून पळवून नेल्याचे सांगितले आहे. महिला कॉन्स्टेबल रेखा ईशी व मारवड येथील प्रतिष्ठित महिलेच्या समक्ष अल्पवयीन मुलीचा जबाब घेण्यात आला. तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. तरुणीचा जबाबावरून आरोपीविरुद्ध अपहरणासह बालकांचा लैंगिक अत्याचार पोस्को कायद्याचे कलमानुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुलीला महिला बाल सुधारगृहात रवाना करण्यात आले आहे.पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या