चोपडा/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- साखरपुड्याची लगबग सुरू असतानाच चोरट्याने तब्बल 12 लाखाचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना चोपड्यानजीक अकुलखेडा येथील सौभाग्य लॉनमध्ये सोमवारी दुपारी 12 ते 1.30 दरम्यान घडली. या प्रकरणी पोलिसांना एकावर संशय आहे. त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. चुंचाळे देवेंद्र नारायण चौधरी (53) यांच्या मुलीचा सौभाग्य लॉन्समध्ये सोमवारी सकाळी साखरपुडा असल्याने वर्हाडींची लगबग सुरू असताना त्यांनी दागिणे एका बॅगमध्ये 26 तोळे वजनाचे दागिने ठेवले होते. सोमवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास चौधरी दागिने घेण्यासाठी गेले असता बॅगेची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर साखरपूड्यात मोठी खळबळ उडाली. पोलीस निरीक्षक अजित साबळे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी देवेंद्र नारायण चौधरी (53, चुंचाळे, ता.चोपडा) यांच्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहेत.