Sunday, February 8, 2026
police dakshta logo
HomeUncategorizedरावेर शहरातून एक तरुण गुढरित्या बेपत्ता; पोलीस घेतायेत शोध

रावेर शहरातून एक तरुण गुढरित्या बेपत्ता; पोलीस घेतायेत शोध

रावेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- रावेर शहरातील एक तरुण बेपत्ता झाला असून त्याची हरविल्याची नोंद रावेर पोलीस स्टेशनला सोमवारी १९ रोजी करण्यात आली आहे. बेपत्ता होण्यापूर्वी, दोन दिवस माझी वाट पहा, अन्यथा पोलीस स्टेशनला तक्रार देऊन टाका असे सांगून हा तरुण निघून गेला आहे. त्यामुळे बेपत्ता होण्यामागील नक्की कारण काय ? याचे गूढ निर्माण झाले आहे.तो नेमका गेला कुठे? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. काशिनाथ रामसिंग बारेला (वय ४०, रा. श्रीराम नगर, रावेर) हे राहत्या घरून बेपत्ता झाले आहेत. ते ट्रॅक्टर चालक आहेत. त्यांच्या पत्नीने पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. दि. १७ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास राहत्या घरून ते मुलांना सांगून गेले की,” मी आता घरुन निघून जात आहे. माझी दोन दिवस वाट पहा, नंतर पोलीस स्टेशनला तक्रार करुन टाका,” असे सांगून जावई मिस्तरी रामसिंग बारेला यांचे दुचाकी क्र. (एमएच १९ डीझेड ९८४६) सोबत घेवून घरून निघून गेले. अद्याप पावेतो ते मिळून आलेले नाही.या प्रकरणी रावेर पोलिसात नोंद करण्यात आली आहे ,पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या