चोपडा/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- मागील काही दिवसापासून चोपड़ा शहरामध्ये घरफोडी चोरीच्या तसेच वाहन चोरीच्या घटना घडलेल्या आहेत अशा प्रकारच्या घटनांना प्रतीबंध करण्यासाठी तसेच अशा प्रकारच्या घडलेल्या घटना उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे चाळीसगांव यांच्या आदेशान्वये तसेच सहा. पोलीस अधिक्षक चोपडा यांच्या मार्गदर्शना खाली दररोज रात्री गस्तसाठी 02 अधिकारी 08 कर्मचारी लावण्यात येत आहेत सदरचे अधिकारी हे रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या भागात गस्त तसेच आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी करीत आहेत.
दि.18 रोजी रात्री 11.00 वाजेपासुन सहा. पोलीस निरीक्षक अजित सावळे, सहा पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, पोलीस नाईक प्रमोद पाटील, शुभम पाटील, मनोहर पवार, सुमेर वाघरे प्रकाश ठाकरे, रविद्र बोरसे, आत्माराम अहिरे हे हद्दीत गस्त करीत असतांना सहायक पोलीस निरीक्षक अजित सावळे व रविंद्र बोरसे यांना गोरगावले रोडवरील समर्थ पार्क कॉलनी परिसरात पहाटे 3 वाजेच्या सुमारास घरफोडी व वाहन चोरी करणारा रेकॉर्डवरील आरोपी प्रशांत जगन वाडे रा. गोरगाव ता. चोपडा हा संशयीतरित्या फिरतांना आढळून आला, त्यास ताब्यात घेवून विचारपुस करता त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर पोलीसांनी त्याच्याजवळ असलेल्या काळ्या रंगाच्या पिशवीची झडती घेतली असता त्यात घरफोडी करण्यासाठी लागणारे साहित्य एक लोखंडी टॅमी दोन मोठे स्क्रु-डायव्हर अनेक प्रकारच्या चाबी पकड तसेच एक लॅपटॉप इत्यादी वस्तू मिळून आले.त्याबाबत विचारपूस केली असता त्याने कोणतेही समाधान कारक उत्तर न दिल्याने आरोपी याने घरफोडी चोरी केलेली असावी, याची पोलीसांना खात्री झाल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनीयम अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.