पारोळा/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. अशाच पारोळा तालुक्यात पुन्हा एका ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे, एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादी नुसार, पारोळा तालुक्यातील एका गावातील ३५ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. याच गावातील संशयित लखन जगन पवार याने रविवार, २५ जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पीडित महिलेला ओळखीचा फायदा घेत दुचाकीवर बसवून जंगलात नेत पिडीतेचे तोंड दाबून तसेच ठार मारण्याची धमकी देत जबरीने अत्याचार केला. भेदरलेल्या पीडीतेने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेत लखन पवारविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.
ओळखीचा फायदा घेत एका महिलेला जंगलात नेऊन अत्याचार
RELATED ARTICLES