Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईममानराज पार्क येथे बेकायदेशीर पिस्तुल घेऊन फिरणाऱ्यास अटक

मानराज पार्क येथे बेकायदेशीर पिस्तुल घेऊन फिरणाऱ्यास अटक

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहरात गुन्ह्यांचे प्रमाण कमी होत नाहीये.कायदा आणि सुव्यवस्था यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मानराज पार्क परिसरात बेकादेशीर गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेवून दहशत निर्माण करणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि २ जिवंत काडतूस हस्तगत केले आहे. याप्रकरणी बुधवार २८ जून रोजी रात्री ११ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानराज पार्क परिसरात संशयित आरोपी नितीन शंकर फुलमाळी (वय-२८) रा. विजय नगर, जळगाव हा बेकायदेशीर हातात गावठी पिस्तूल आणि दोन जीवंत काडतूस घेवून दहशत पसरवित होता. याबाबतची असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या ( एलसीबी) पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने बुधवार २८ जून रोजी रात्री ९ वाजता कारवाई करत संशयित आरोपीला मानराज पार्क परिसरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून ३० हजार रूपये किंमतीचे गावठी पिस्तूल आणि १ हजार रूपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस हस्तगत केले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या