सोलापूर/ जिल्हा प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- मंद्रूप (सोलापूर ) र अंत्रोळी -सोलापूर येथे बकरी ईद उत्साहात साजरी केली गेली. ईदनिमित्त येथील ईदगाह मैदानावर ( दर्गाह) मध्ये मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. सकाळी नऊच्या सुमारास मौलाना यांनी नमाज पठण केले. नमाज पठणानंतर मौलाना यांनी बकरी ईद बाबत माहिती दिली. अल्लाहचे प्रेषित हजरत इब्राहिम, त्यांची पत्नी हाजरा यांची अल्लाहच्या प्रती भक्ती, बलिदान, त्याग आणि विश्वास यांची आठवण म्हणून ही ईद साजरी केली जाते. इस्लामी कालगणनेनुसार जिल्हज या शेवटच्या महिन्याच्या आठ ते बारा तारखेदरम्यान मक्का मदिना येथे होणा-या हज यात्रेत सर्व विधी पार पाडले जातात. तसेच नमाज पठणानंतर सर्व मुस्लिम बांधवानी हिंदू व मुस्लिम बांधवांना सणानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच हिंदू आणि मुस्लिम बांधवांमधील एकता व अखंडता टिकून रहावी यासाठी प्रार्थना केली. नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईद मुबारक म्हणत गळेभेट घेत बकरी ईदच्या शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी माजी उपसरपंच मजनोद्दीन पठाण यांनी बोलतांना आपले मनोगत व्यक्त केले.
अंत्रोळी -सोलापूर येथे बकरी ईद उत्साहात साजरी
RELATED ARTICLES

