अहमदनगर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिस उपनिरीक्षकानेच महिलेवर आहे. बलात्कार केल्याची घटना घडना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. उपनिरीक्षक सज्जनकुमार नन्हेडा असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणाने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसंच त्या महिलेला धमकावून घरी नेत बलात्कार केला, अशी तक्रार पीडित महिलेने केली आहे. जमीन खरेदीत फसवणूक झाल्या प्रकरणी पीडित महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्याचसंदर्भात तपासाचे काम सुरु असताना आरोपीने महिलेला वेळोवेळी त्रास दिला होता. राहुरी तालुक्यातील महिलेच्या फिर्यादीवरुन कलम ३७६ क (ब) व कलम ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपी सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे,अशी माहिती पोलिसांनी दिली.