कल्याण/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- उल्हासनगर शहरातील भाजपचे पदाधिकारी आणि केबल व्यावसायिक नरेश रोहरा यांच्या कार्यालयावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. त्यावेळी प्रत्युत्तर म्हणून अंगरक्षकांनी देखील शुटरच्या दिशेने गोळीबार करत त्यांना पळवून लावले होते. गोळीबाराचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात चार ते पाच शुटर विरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू केला असता, मुख्य शुटरला गुजरातच्या सुरतमधून तर दुसऱ्याला नाशिकच्या सिन्नरमधून आणि एकाला उल्हासनगर मधून बेड्या ठोकल्या आहेत. दिलावर हरी चव्हाण (वय २२), मनोज महेश गुप्ता (वय १९) आणि गणेश गंगाराम मेरूकर (वय २४) असं अटक केलेल्या शुटरची नावे आहेत.
उल्हासनगरचे भाजपा पदाधिकारी यांच्या कार्यालयावर गोळीबार
RELATED ARTICLES

