Monday, February 9, 2026
police dakshta logo
Homeजळगावगोलाणी मार्केटमधील मोबाईल विक्रीचे दुकान फोडण्याचा प्रयत्न फसला

गोलाणी मार्केटमधील मोबाईल विक्रीचे दुकान फोडण्याचा प्रयत्न फसला

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहरात छोट्या-मोठ्या चोऱ्या सुरूच असून पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. मध्यवर्ती भागात असलेल्या गोलाणी मार्केट परिसरातील मोबाईल दुकान फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती वरून, विनीत कैलासकुमार आहुजा (वय ३१) – रा. गणेश नगर, जळगाव हा तरूण परिवारासह राहायला आहे. त्याचे शहरातील गोलाणी मार्केट परिसरात श्री.एस.एस.डी नावाचे मोबाईल दुकान आहे. १८ जुलै रोजी मध्यरात्री अज्ञात दोन चोरट्यांनी मोबाईल दुकानाचे गच्चीवरील लोखंडी गेटचे कुलूप तोडून गॅलरीतून प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील सामानांची चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. याप्रकरणी दुकान मालक विनीत आहुजा यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून गुरूवारी २० जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी उमेश भांडारकर करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या