भुसावळ/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- येथे स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे.सदैव आपल्या सर्वांसाठी रात्रंदिवस कार्यरत असलेल्या महीला पोलिसांना सुद्धा दैनंदिन जीवनात आपल्या मैत्रिणीपासून दुरावा मिळू नये, त्यांच्याही मैत्रिणी असाव्यात या हेतूने प्रेरित होऊन येथील लीनेस क्लबच्यावतीने’ फ्रेंडशिप डे’ साजरा करण्यात आला.यावेळी क्लबच्या महिलांनी महिला पोलिसांना मैत्रीबंध बांधून मैत्रिणी केल्या . प्रसंगी महिला पोलिसांनी या उपक्रमाचे स्वागत आणि कौतुक करीत समाधान व्यक्त करून एकमेकांना मैत्रीबंध बांधत मैत्री स्वीकारली .
दरम्यान तालुका पोलीस स्टेशन तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशनमधील कार्यरत महिला पोलीस यांना मैत्रीबंध बांधण्यात आला तसेच भेटवस्तू देण्यात आली .प्रसंगी बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस निरिक्षक गजानन पडघन व सहकारी अधिकारी यांचेही स्वागत करण्यात आले. त्यामध्ये अश्विनी जोगी मॅडम ,मीना कोळी, मॅडम सीमा चौधरी मॅडम, समीना, तडवी मॅडम, प्रमिला गजरे मॅडम यांचेही पदाधिकाऱ्यांनी क्लबच्यावतीने पुष्पगुच्छ देवून स्वागत केले . प्रसंगी लिनेस क्लब अध्यक्ष प्रियंका चौधरी सेक्रेटरी वैशाली सैतवाल, उज्वला बागुल, प्रचना तांबोळी, मनीषा धांडे, रीना गायकवाड, पूजा बलके, विजया निकम, वैशाली विसपुते आदी उपस्थित होत्या .

