Monday, February 9, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याभडगाव तालुक्यात वीज मीटरमध्ये छेडछाड; लाखोंची वीज चोरणाऱ्यास सक्तमजुरीची शिक्षा

भडगाव तालुक्यात वीज मीटरमध्ये छेडछाड; लाखोंची वीज चोरणाऱ्यास सक्तमजुरीची शिक्षा

भडगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जिल्ह्यात वीज चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत.औद्योगिक वापरासाठी घेतलेल्या वीज मीटरमध्ये छेडछाड करून २४ महिन्यांत महावितरण कंपनीची १५ लाखांची फसवणूक करणाऱ्यास जिल्हा न्यायालयाने दहा हजार रुपये दंड व एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.दोनगाव (ता. भडगाव) येथील औद्योगिक क्षेत्रात रऊफ अली अहमद अली यांची कंपनी आहे. त्यासाठी त्यांनी महावितरणचे वीज मीटर घेतले होते. त्यात छेडछाड करून रिमोट कंट्रोल व जामरच्या मदतीने मीटर बंद केले होते. सुमारे २४ महिन्यांच्या कालावधीत एक लाख ११ हजार ७८९ युनिटची चोरी करून महावितरणचे १५ लाख ३३ हजार ६९० रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. हा खटला जिल्हा न्यायाधीश ४ आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे.जे.मोहिते यांच्या कोर्टात चालला. या खटल्यात सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता वैशाली महाजन यांनी काम पाहिले.दरम्यान वीज चोरी रोखण्यासाठी विविध प्रकारचे पथक ही तैनात करण्यात आलेले असतात, असे असतानाही चोरी होत असते,या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या