पुणे (प्रतिनिधी)- राज्यात लाच प्रकरण हे सर्वच क्षेत्रात वाढत चालले आहे.व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्यासाठी १६ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) अटक केली आहे.मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली. आशिष बनगिनवार असे अटक केलेल्याचे नाव आहे.महाविद्यालयात असलेल्या १५ टक्के व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळण्यासाठी शासनमान्य २२ लाख ५० हजार व्यतिरिक्त बनगिनवार यांनी एका एका विद्यार्थिनीच्या पालकांकडे १६ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील पहिला हफ्ता १० लाख रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.एसीबीने बनगिरवार यांना ताब्यात घेण्यासाठी सापळा लावला होता. तक्रारदार यांच्याकडून पैसे स्वीकारताना त्यांना पकडले. या कारवाईमुळे महाविद्यालय परिसरात खळबळ उडाली आहे.
कोट्यातून प्रवेश मिळवून देण्यासाठी १६ लाखांची लाच मागणाऱ्या पुण्याच्या वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्याला अटक..!
RELATED ARTICLES

