Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमधरणगाव तालुक्यात शेतकऱ्याला कुऱ्हाडीचा धाक दाखवून ऐवज लुटला

धरणगाव तालुक्यात शेतकऱ्याला कुऱ्हाडीचा धाक दाखवून ऐवज लुटला

धरणगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- धरणगाव तालुक्यातील शामखेडा शिवारातील शेतात एका शेतकऱ्याला जमावाने डोक्यावर कुऱ्हाड मारून दुखापत केली, त्याच्याजवळील मोबाईल, रोख रक्कम असा एकूण १५ हजारांचा मुद्देमाल जबरी हिसकावून चोरी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुरूवार १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बिपीनचंद्र जगन्नाथ तिवारी (वय-५२) रा. धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्याचे धरणगाव तालुक्यातील शामखेडा शिवारात गट नंब ८७ मध्ये शेत आहे. गुरूवार १० ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता शेतात असतांना काहीही कारण नसतांना संदिप रतिलाल सोनवणे, गोपाल, नरेश आणि सागर सर्व राहणार आनोरा ता. धरणगाव तसेच शाहदू नाईक रा. कंडारी ता.अमळनेर, गोपाल रा. अमळनेर यासह इतर १५ ते १७ जणांनी येवून बिपीनचंद्र तिवारी यांच्या डोक्यावर कुऱ्हाड मारून दुखापत केली.तसेच त्यांच्या जवळील मोबाई आणि ५ हजारांची रोकड जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना घडल्यानंतर बिपीनचंद्र तिवारी यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या