Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमखान्देशात दुधाचे माहेरघर असलेल्या चाळीसगावात शेकडो लिटर भेसळयुक्त दूध नष्ट....!

खान्देशात दुधाचे माहेरघर असलेल्या चाळीसगावात शेकडो लिटर भेसळयुक्त दूध नष्ट….!

चाळीसगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-  खान्देशात एकेकाळी दुधाचे माहेरघर असलेल्या चाळीसगाव शहरात भेसळयुक्त दूध आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.चाळीसगावाला दुधाचे शहर म्हणून ओळखले शहरातील अनेक दूध डेअऱ्यांवर प्रशासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांमार्फत एकत्रित छापे टाकण्यात आले. शहरातील स्टेशन रोडवरील नामांकित दूध व दुग्धजन्य पदार्थ विकणाऱ्या आस्थापनांवर तसेच दूध सागर मार्ग परिसरातील दूध डेअऱ्यांवर अचानक छापा टाकण्यात आला.

दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गठीत केलेल्या भरारी पथकाने शहरातील दूध डेअरी आणि दूध संकलन केंद्रांमध्ये जाऊन दुधाच्या नमुन्यांची तपासणी केली.तपासणीत अनेक ठिकाणी पाणी मिश्रित भेसळयुक्त दूध आढळून आले. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या या भरारी पथकाने दुपारी दोनपर्यंत १ हजार ३८२ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट केले आहे. मात्र भेसळयुक्त दूध आढळलेल्या डेअरी मालकांवर आस्थापनांवर कुठली कारवाई करण्यात आली, याची माहिती अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेली नाही.या भरारी पथकात अन्न व औषध प्रशासन विभाग, कृषी, पशुसंवर्धन मत्स्य, दुग्ध विकास विभाग, वजनमाप शास्त्र विभाग तसेच स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता.ही कारवाई अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त स.कृ. कांबळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त श्‍यामकांत पाटील, उपनियंत्रक वजनमाप शास्त्र विभागाचे बी.जी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा दुग्धविकास अधिकारी वाय.आर.नागरे यांच्या पथकात संतोष कांबळे व इतर विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या पुढे दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी ही मोहिम सुरू राहणार असल्याची माहिती वाय.आर.नागरे यांनी दिली आहे.दुधात केमिकल नव्हे; प्रमाणापेक्षा जास्त पाणीदूध आणि दुग्धजन्य पदार्थांची भेसळ रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गठीत केलेल्या पथकाने चाळीसगाव शहरातील डेअऱ्यांवर छापे टाकले. या कारवाईमध्ये अनेक ठिकाणी भेसळयुक्त दूध आढळून आले. दुधात प्रमाणापेक्षा जास्त पाणी आढळून आल्याने हजारो लिटर दूध नष्ट करण्यात आले. मात्र या दुधात युरिया किंवा अन्य केमिकल पदार्थ आढळले नसल्याचे प्रथमदर्शी दिसून आले आहे. परंतु दुधात मिश्रित केलेले पाणी कसे आहे, पाण्याची गुणवत्ता काय? असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या