जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- दि.10 ऑगस्ट रोजी जळगांव शहर Aclap संघटने तर्फे महाराष्ट्र राज्य Aclap संघटनेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त वर्धापना चे औचित्य साधून जळगांव शहर ॲक्लाप संघटने तर्फे मातोश्री आनंदाश्रम येथे आजी व आजोबांचे CBC व RBS रक्त तपासणी करण्यात आली. तपासणी नंतर आनंदाश्रमचे श्री.कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले. प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील यांनी मनोगत व्यक्त करून संघटनेच्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी सुनील चौधरी, रामकृष्ण रावतोळे, लक्ष्मीकांत त्रिपाठी, भूषण क्षत्रिय व प्रमोद सोनार ई. उपस्थित होते.
जळगांव Aclap संघटने तर्फे आनंदाश्रम येथील आजी, आजोबांची CBC व RBS रक्त तपासणी..
RELATED ARTICLES

