Monday, February 9, 2026
police dakshta logo
Homeजळगावमोटरसायकल स्वाराला मारहाण करून लुटमार करणारे आरोपी जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी..

मोटरसायकल स्वाराला मारहाण करून लुटमार करणारे आरोपी जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी..

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- मोटरसायकल स्वाराला मारहाण करून लुटमार करणारे आरोपीना पोलिसांनी जेरबंद केले आहे.15ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास तारीक अलताफ खाटीक (वय 23 धंदा खाजगी नोकरी रा. गुलाब बाबा कॉलनी प्लॉट नं. 37 मेहरुण रोड गॅलक्सी कलेक्शन समोर जळगाव) हे त्यांच्या मोटारसायकलने जळगाव शहरातील मेहरुण ट्रॅकवर जात असतांना त्यांना मोटार सायकल क्र. MH 19 DU 4610 ने धडक मारुन अपघात केला होता. अपघात करणा-या व त्यांच्यासोबत असलेल्या मोटारसायकलवर एकूण 4 व्यक्ती होते.त्यांनी तारीक अल्ताफ खाटीक यांना अपघात झाल्याच्या कारणावरुन लाथाबुक्के व दगडाने मारहाण करुन मोबाईल फोन मोटोरोला कंपनीचा एज 40 मॉडेल 25 हजार रुपये किमतीचा, 500 रुपये किंमतीचे बोट कंपनीचे ब्ल्यु टुथ हेडसेट,एक हजार रु.किमतीचे सोनाटा कंपनीचे मनगटी घड्याळ, 600 रु. रोख त्यांच्या खिशातून असे एकुण 27100 रुपये किमतीचा एैवज बळजबरीने काढून घेवून ते पळून गेले होते. याबाबत दिनांक 15 ऑगस्ट रोजी तारीक अल्ताफ खाटीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोन्ही मोटर सायकल वरील अज्ञात 4 व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.हा गुन्हा दाखल झाल्या नंतर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने लागलीच तपास सुरु करण्यात आला होता त्या दरम्यान पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना माहिती मिळाली की ,गुन्हा हा रामेश्वर कॉलनी परिसरातील काही तरुणांनी केला आहे. म्हणून परिसरात राहणारे राहुल नाना राजपुत (वय 23 वर्ष) रा. रामेश्वर कॉलनी बैठक हॉल जवळ जळगाव, रितेश भिकन चौधरी (वय 18) रा. रामेश्वर कॉलनी बैठक हॉल जवळ जळगाव यांना ताब्यात घेतले होते. त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले मोटर सायकल . क्र. MH 19 DU 4610 व एक 25 हजार रुपये किमतीचा मोटोरोला कंपनीचा मोबाईल फोन एज 40 मॉडेल जप्त करण्यात आलेला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता मा. न्यायमूर्ती श्रीमती सुवर्णा कुलकर्णी यांनी आरोपींना 4 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे.आरोपीतांचे सोबत असलेले दोन आरोपी हे फरार आहेत.त्यांचा शोध सुरु आहे.सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक हिरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे, सहाय्यक फौजदर अतुल वंजारी, इम्रान बेग ,सचिन मुंढे, रामकृष्ण पाटील, इम्रान सैय्यद , सुधीर साळवे, किशोर पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी यांनी केली.

 

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या