मुंबई/ प्रतिनिधी – दिवाळीप्रमाणेच गौरी गणपतीला राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार या आता शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल देण्यात येणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने महाराष्ट्र कॅसिनो कायदा देखील रद्द करण्यात आला आहे. राज्यातील 17 जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार आहेत.
भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबवणार आहे. यासाठी पाच हजार कोटीचा प्रस्ताव आहे. तसेच आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात भरीव वाढ करण्यात येणार आहे.

